मुंबई (Maharashtra Politics) : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा जन्म कोकणात झाला असल्याचं वक्तव्य भाजपचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad, BJP) यांनी केल्यानंतर आगोदरच महाराजांविरोधातील वादग्रस्त वक्तव्याने तापलेल्या वातावरणाला फोडणी मिळाली आहे. लाड यांनी कोकण महोत्सवाच्या (Kokan Mahotsaw) निमित्तानं आयोजीत करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत हे वक्तव्य केलं आहे. त्यांच्या वक्तव्याचा राज्यभरातून निषेध केला जात आहे. त्यावर प्रसाद लाड यांनी दिलीगिरी देखील व्यक्त केली आहे. (BJP Leader Prasad Lad Speaks Controvercial Statement After Bhagatsingh Koshyari and Sudhanshu Trivedi)
प्रसाद लाड यांनी “स्वराज्याभूमी कोकण महोत्सव’ (Swarajyabhumi Konkan Mohotsaw) दरम्यान छात्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला. त्याचं बालपण देखील कोकणात रायगडावर गेलं” असं वक्तव्य पत्रकार परिषदेत केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरून महाराष्ट्राच्या अगोदरच तापलेल्या राजकारणात ठिणगी पडल्याचं दिसत आहे. प्रसाद लाड यांना विरोधी पक्षातील नेत्यांकडून धारेवर धरले गेले आहे.
दरम्यान, त्यांच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया यायला लागल्यानंतर त्यांनी एक व्हिडीओ शेअर करत दिलगिरी व्यक्त केली आहे. “माझ्या बोल्यातून चुकून काही शब्द निघाले मात्र, माझ्या बोलण्याचा तो उद्देश नव्हता. छत्रपती शिवाजी महराजांच्या नावावारून विनाकारण राष्ट्रवादीकडून राजकारण केलं जात आहे. माझ्या वक्तव्याने कोणाच्याही भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो.” असा दिलगिरी व्यक्त करणारा व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे.