दहशतवाद्यांच्या टार्गेटवर भाजपचे नेते : एनआयए

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यानंतर गोंधळलेल्या पाकिस्तानने दहशतवादासाठी काश्मिरी पत्रकार आणि विद्यार्थ्यांची भर्ती केली आहे. यामध्ये भाजप कार्यकर्ते आणि त्यांच्या सहयोगी पक्षाचे कार्यकर्ते हिटलिस्टवर आहेत. असा राष्ट्रीय तपास संस्थेनं (एनआयए) दावा केला आहे. एएनआयनं दहशतवादी कट प्रकरणात २ हजार पानांचं आरोपपत्र दाखल केलं आहे. यामध्ये हे धक्कादायक दावे करण्यात आले आहेत.

एएनआयने आपल्या आरोपपत्रात, ऑडिओ रेकॉर्डींग, लेख आणि चौकशीचा हवाला देत दावा केला आहे की, ओव्हर ग्राउंड वर्कर्स आयएसआय-समर्थित द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ)चे दहशदवादी बनले होते. त्यांना काश्मीरमधील सत्ताधारी पक्षातील भाजप कार्यकर्ते, मित्र पक्ष आणि नेत्यांवर हल्ले करण्याचे काम दिले होते. पाकिस्तानस्थित दहशतवादी कमांडरच्या निर्देशानुसार, दहशतवादी संघटनांच्या सक्रिय कार्यकर्त्यांच्या संगनमताने आरोपी इश्फाक अमीन वाणी याने जेके अपनी पार्टीचे अल्ताफ बुखारी, भाजपच्या हिना बेग यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांची बटमालूच्या कोर्ट कॉम्प्लेक्समध्ये हत्या केली असंही आरोपपत्रात म्हटलं आहे.

Prakash Harale: