छत्रपती संभाजीनगर | Maratha Protest : सध्या संपूर्ण राज्यभरात मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षणावरून अनेक ठिकाणा आंदोलनाला हिंसक वळण आल्याचं पाहायला मिळालं. एकिकडे बीडमध्ये आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगफेक करण्यात आली. तर आता दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आमदार प्रशांत बंब (Prashant Bamb) यांचं कार्यालय फोडण्यात आलं आहे.
गंगापूर शहरात प्रशांत बंब यांचं कार्यालय आहे. हे कार्यालय मराठा आंदोलकांनी फोडलं असून कार्यालयातील खुर्च्या तोडत, काचा फोडच सर्व सामानाची नासधूस केली आहे.
प्रशांत बंब यांचे कार्यालय फोडल्यानंतर आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर आंदोलकांनी गंगापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे सध्या तिथे हिंसक आंदोलन पाहायला मिळत आहे.