“शरद पवारांसारखे राष्ट्रपती झाले तर देशात दहशतवाद वाढेल”

मुंबई- BJP MP Comments On Sharad Pawar | काहीच दिवसांपूर्वी पार पडलेल्या राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता देशभरात सर्वांचे लक्ष राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीकडे लागलेले आहे. देशात सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांत उमेदवार निवडीसाठी बैठका सुरु झाल्या आहेत. त्यात विरोधी पक्ष कॉंग्रेस कडून शरद पवारांच्या नावाची चर्चा सुरु होती, मात्र त्यांनी उमेदवारीसाठी नाव देण्यास नकार दिला. सत्ताधारी पक्षातही उमेदवारीसाठी बैठका सुरूच आहेत. आत्तापर्यंत अकरा जनांनी उमेदवारीसाठी अर्ज दाखल केले आहेत.

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी सर्व पक्षांत राजकारण सुरु असतानाच पश्चिम बंगालमधील भाजपच्या खासदाराने शरद पवार यांच्या उमेदवारीवरून घणाघाती टीका केली आहे. खासदार दिलीप घोष यांनी शरद पवारांचे दहशतवाद्यांशी संबंध होते असा आरोप केला आहे. त्यामुळे असे राष्ट्रपती असतील तर देशात दहशतवाद वाढेल. असंही ते म्हणाले.

काही दिवसांपूर्वी शरद पवार आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांची दिल्लीत भेट झाली होती. त्यांच्यात आगामी १८ जुलैला होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र शरद पवारांनी या भेटीत देशाच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली असल्याचं ट्विट करून सांगितलं होत.

राष्ट्रपती पदासाठी १८ जुलै २०२२ रोजी निवडणूक होणार आहे. त्यानंतर २१ जुलैला मतमोजणी होणार आहे. त्यानंतर २४ जुलै रोजी विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद याचा कार्यकाळ संपेल आणि नवीन राष्ट्रपतीच्या नावाची ओळख होईल.

Dnyaneshwar: