नवी दिल्ली : (Varun Gandhi BJP over Agnipath scheme) केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ‘अग्निपथ योजनेची घोषणा केली. त्यानंतर वाढता विरोध पाहता सरकारनं योजनेत काही बदल करायला सुरुवात केली. यावरून भाजप खासदार वरुण गांधी यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. सुरक्षा आणि तरुणांच्या भविष्याचा प्रश्न असेल तेव्हा संवेदनशील सरकारने आधी निर्णय, मग विचार’ करणे योग्य नाही, असे ट्विट त्यांनी केले. तसेच त्यांनी सरकारच्या संवेदनशीलतेवरही प्रश्न उपस्थित केले.
दरम्यान, वरुन गांधी पुढे म्हणाले, आदरणीय राजनाथ सिंह जी, देशातील तरुणांच्या मनात अग्निपथ योजनेबाबत अनेक प्रश्न आहेत. तरुणांना संभ्रमावस्थेतून बाहेर काढी. सरकारने योजनेशी संबंधित धोरणात्मक तथ्ये लवकरात लवकर समोर ठेवून भूमिका स्पष्ट करावी. असं वरुण गांधी यांनी १६ जून रोजी राजनाथ सिंह यांना लेटर पॅडवर लिहिलेले पत्र जारी करून म्हटलं आहे.
आपण तरुणांच्या संघर्षात प्रत्येक टप्प्यावर त्यांच्यासोबत उभा आहे. सर्वांनी संयमाने वागावे आणि लोकशाही प्रतिष्ठा जपत निवेदन विविध माध्यमातून शासनाला पत्र पाठवावे ही नम्र विनंती. सुरक्षित भविष्य हा प्रत्येक तरुणाचा हक्क आहे असं ते म्हणाले आहेत.