भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्यपालांच्या छत्रपतींवरील वादग्रस्त वक्तव्याने अमोल कोल्हे संतप्त; म्हणाले, “भाजपला नेमकं…”

मुंबई – Amol Kolhe On Sudhanshu Trivedi : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsinh Koshyari) यांनी काल छत्रपती शिवाजी महाराजांवर (Chhatrapati Shivaji Maharaj) वादग्रस्त वक्तव्य केल्याने संपूर्ण राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील किली जात आहे. दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra) राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल (Swatantryaveer Savarkar) वक्तव्य केलं होतं. त्यावरून भाजपच्या अनेक नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या होत्या. ‘सावरकरांनी ब्रिटीशांची माफी मागितली होती आणि ब्रिटीशांची मदत केली होती’ असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं होतं. त्यावरून भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांनी प्रतिक्रिया देत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यावरून देखील राज्यातील जनता आणि विरोधकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. (Amol Kolhe On Bhagatsinh Koshyari And Sudhanshu Trivedi)

काय म्हणाले भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी, “सावरकर यांनी ब्रिटीशांची माफी मागितली यात वेगळं काही नाहीये. त्याकाळी माफी मागील्ती जात असे. शिवाजी महाराजांनी देखील औरंगजेबाची पाच वेळा माफी मागितली होती.” असं वादग्रस्त वक्तव्य सुधांशू त्रिवेदी यांनी केलं आहे.

भाजपला नक्की खुपतंय काय? – अमोल कोल्हे संतप्त
दरम्यान, राज्यपाल आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते यांच्या वादग्रस्त वक्तव्याने राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे यांनी देखील यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. सुधांशू त्रिवेदी यांनी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागावी आणि आपले वक्तव्य मागे घ्यावे अशी मागणी अमोल कोल्हे यांनी केली आहे. त्याचबरोबर महाराजांनी स्वराज्यातील लोकांना स्वाभिमानाची जाणीव करून दिली. तरीही भाजपकडून अनेकवेळा अशा प्रकारचे वक्तव्ये केली जात आहेत. भाजपने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी अमोल कोल्हे यांनी केली आहे.

Dnyaneshwar: