मुंबई : (BJP On Devendra Fadnavis Site In Party) गुरुवार दि. ३० रोजी सकाळी एकनाथ शिंदे हे गोव्यातून मुंबईला आल्यानंतर राज्यातील राजकारणाला वेग आला. फडणवीस यांच्या भेटीनंतर भाजपचं शिष्टमंडळ आणि शिंदे गटातील एकनाथ शिंदे यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. त्यानंतर सायंकाळी एकटे एकनाथ शिंदे हे शपथ घेणार असून मी सरकार बाहेर राहून लक्ष ठेवणार असं देवेद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर सांगितलं.
मात्र, यानंतर असा प्रश्न निर्माण झाला होता की, शिंदे हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असतील तर फडणवीसांचे काय? फडणवीसांनी मोठं मन दाखवत मंत्रिमंडळात सहभागी होणार नसल्याचे सांगितलं त्यांनंतर काहीच वेळात दिल्लीतील वरिष्ठांच्या आग्रहामुळे फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
भाजपनं शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देऊन देवेंद्र फडणवीस यांचे पंख छाटत जोराचा झटका दिला आहे. कारण शिंदे यांना मुख्यमंत्री पदावर विराजमान करुन फडनवीसांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यास पक्ष श्रेष्ठींनी भाग पडलं आहे. यामुळे फडणवीस यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेलाही हा धक्का मानला जात आहे. हे फडणवीस यांचे पंख छाटण्याचं काम भाजप पक्षश्रेष्ठींकडून करण्यात आल्याचं बोललं जात आहे.