ओबीसी आरक्षणाला भाजपचा विरोध; भुजबळांचा आरोप

मुंबई : ओबीसींचा इम्पेरिकल डेटा लवकर मिळावा म्हणून मागासवर्गीय आयोगाकडे केली आहे. अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. ओबीसी आरक्षणासाठी भाजपकडून अडथळे आणले जात असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी सर्वोच्च ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्य मागास आयोगाची भेट घेतली. त्यात आपण वरील मागणी केल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच कोर्टात टिकेल असा डेट तयार करण्याची आयोगाला विनंती केली असल्याचेही यावेळी भुजबळ यांनी सांगितले.

या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी देखील बैठक पार पडल्याचे ते म्हणाले. स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर यावेळी चर्चा करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याची वेळ जर आलीच तर, भाजपाप्रमाणित ओबीसी जागेवर ओबीसी उमेदवार देऊ असेही यांनी यावेळी सांगितले. भाजपच्या राहुल वाघ यांचा ओबीसी आरक्षणाला विरोध असून, त्यांनाही याबाबत विनंती करणार असून, वाघ यांची समजूत काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना विनंती करणार असल्याचेही भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

Prakash Harale: