मुंबई : (BJP senior leader on chandrakant patil) सध्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मुदत संपत आहे. शिवाय आता महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस युतीचे सरकार आल्याने केंद्रीय नेतृत्वाचे विश्वासू चेहरे या मंत्रिमंडळात असतील. त्यात काही नव्या लोकांनाही संधी मिळेल. चंद्रकांत पाटील यांनी मागील फडणवीस सरकारच्या काळात महसूल व सार्वजनिक बांधकाम अशा दोन महत्त्वाच्या खात्यांचे मंत्रीपदांसद नंतरच्या काळात कृषी यासारखी पदे भूषवले होते.
दरम्यान, गुरुवार दि. ३० जुन रोजी महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर मंत्रीपदाची जबाबदारी येईल असा आंदाज वर्तवला जात आहे. पुढील विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून एका तरुण व आक्रमक चेहऱ्याची निवड भाजप प्रदेशाध्यक्षपदावर होईल, असे समजते. त्यात मंत्रिमंडळात अपेक्षित असलेला एक प्रमुख नेता प्रदेशाध्यक्षपदी नेमून भाजपचे केंद्रीय नेतृत्व पुन्हा एकदा धक्कातंत्राचा अवलंब करण्याची शक्यता आहे.
दहा वर्षांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस हे झाल्यानंतर पक्ष महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचले. त्यातून मुख्यमंत्री झाले आणि महाराष्ट्र भाजपला एक तरुण व आक्रमक चेहरा मिळाला. मात्र, त्यानंतर महाराष्ट्रभर पकड असलेला दुसरा भाजप नेता तयार होण्यात विविध अडचणी आल्या. पक्षश्रेष्ठी आता भविष्याचा विचार करून एक तरुण व आक्रमक चेहरा प्रदेशाध्यक्षपदी नेमून महाराष्ट्र भाजपमध्ये देण्यात येणार असल्याचं समजत आहे. यामुळं भाजप पक्षश्रेष्ठी फडणवीसांनंतर आता चंद्रकांत दादा पाटील यांना धक्का देण्याच्या तयारीत आहे.