विधानपरिषद निवडणूकीत भाजप करणार एकनाथ खडसेंचा गेम?

मुंबई : एकनाथ खडसे यांना भाजपमध्ये डावललं गेल्यानं त्यांनी अखेर राष्ट्रवादीत प्रवेश केला. मात्र, राष्ट्रवादीच्या तिकीटावर देखील त्यांचा पराभव करून महाविकास आघाडी आणि थेट पवारांनाच आव्हान द्यायचं, प्लॅनिंग भाजपचं आहे. राष्ट्रवादीचं सध्याचं संख्याबळ पाहता रामराजे नाईक-निंबाळकर यांना निवडून आणण्यासाठी आवश्यक मतांचा कोटा राष्ट्रवादीकडे आहे. मात्र, एकनाथ खडसे यांचं पारडं अगदी कट-टू-कट आहे. त्यामुळे मतं फुटल्यास खडसेंना त्याचा थेट फटका बसू शकतो.

दरम्यान, राज्यातील विधान परिषदेच्या दहा जागांच्या निवडणूका अवघ्या दोन दिवसावर येवून टेकल्या आहेत. त्यातून वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभुमिवर आज संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसची ट्रायडेन्ट हाॅटेलला बैठक होणार आहे. त्याआधीच खडसे आणि रामराजेंची भेट होणार असल्याची माहिती मिळत आहे. संध्याकाळी पार पडणाऱ्या बैठकीला राष्ट्रवादीचे अनेक बडे नेते उपस्थित राहणार आहेत.

मात्र, राष्ट्रवादीकडे सध्या ५४ आमदार आहेत. यातील पहिल्या पसंतीची मतं रामराजे यांना गेल्यास उर्वरीत मतांवर खडसेंना भागवावं लागणार आहे२७ मतांचा आकडा पूर्ण करण्यासाठी खडसेंना अतिरिक्त दोन मतांची गरज भासू शकते. ऐनवेळी राष्ट्रवादीकडून रामराजेंच्या मतांचा कोटा वाढवण्यात येऊ शकतो. मतं बाद होण्याचं प्रमाण, मतं फुटण्याची शक्यता लक्षात घेता खडसेंनाही त्यांच्यासाठी मतांची बेगमी करावी लागणार आहे.

Prakash Harale: