…त्यामुळे कर्नाटकात भाजपच मारणार मुसंडी? केंद्रीय नेत्याचं अजब गणित; तीन निवडणुकांची आकडेवारी केली सादर

Karnataka Election Result 2023 | कर्नाटक विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे. सध्या सुरुवातीचे काही कल हाती आले आहेत. यामध्ये काँग्रेसनं (Congress) बाजी मारली असून भाजपला (BJP) मोठा धक्का बसला आहे. तसंच एकिकडे कर्नाटक निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळण्याचा दावा काँग्रेसकडून केला जात असताना, दुसरीकडे भाजपच्या केंद्रीय नेत्यानं भाजपच विजयी होणार असल्याचा दावा केला आहे.

भाजपचे आयटी विभागाचे राष्ट्रीय प्रमुख अमित मालवीय (Amit Malviya) यांनी भाजपच्या विजयाचं गणित मांडंल आहे. यामध्ये त्यांनी मागील तीन निवडणुकांची आकडेवारी सादर केली आहे. यासंदर्भातलं एक ट्विट त्यांनी केलं आहे.

“सर्व एक्झिट पोल्सचे अंदाज हे मतांच्या आकडेवारीवर अवलंबून असतात. या निवडणुकीत 73.19 टक्के म्हणजेच आत्तापर्यंतचं सर्वाधिक मतदान कर्नाटकमध्ये झालं आहे”, असं अमित मालवीय यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

पुढे मालवीय यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, “2008 मध्ये भाजपनं 110 जागा जिंकल्या होत्या. पण 33.86 टक्के मतं पक्षाला मिळाली होती. तर काँग्रेसला 34.76 टक्के मतं मिळूनही त्यांना फक्त 80 जागा मिळाल्या होत्या. 2018 मध्ये भाजपनं 104 जागा जिंकल्या असताना 36.22 टक्के मतं पक्षाला मिळाली होती. तर दुसरीकडे 38.14 टक्के जागा मिळूनही काँग्रेसला फक्त 80 जागा जिंकता आल्या होत्या. तसंच 2013 साली भाजप आणि कर्नाटक जनता पक्ष यांच्यात हिंदू मतांची विभागणी झाल्यामुळे काँग्रेसला त्याचा फायदा झाला नव्हता. त्यामुळे कितीही टक्के मतं मिळाली, तरी काँग्रेसला कधीच 80 जागांच्या वर मजल मारता आलेली नाही.”

“2023च्या एक्झिट पोलमध्ये भाजपला 37 टक्के मतं मिळतील तर काँग्रेसला 40 टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे. तसंच 3 टक्क्यांचा हा फरक असल्यामुळे निकाल काय येईल, याचा अंदाज कुणालाही बांधता येऊ शकत नाही”, असंही मालवीय यांनी म्हटलं आहे.

Sumitra nalawade: