राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला भाजपचे ग्रहण…

नवी दिल्ली : उत्तर भारतीयांवर सडकुन टिका करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मोर्चा आता हिंदुत्वाच्या भूमिकेकडे वळला आहे. ५ जुनला अयोध्या दौऱ्यावर असणाऱ्या राज ठाकरे यांना उत्तर भारतीयांच्या रोशाला सामोरे जावा लागणार आहे. २००८ साली रेल्वे भरतीवेळी उत्तर प्रदेश व बिहारच्या परिक्षार्थ्यांवर मनसे कार्यकर्त्यांकडून झालेल्या हल्ल्यांबद्दल व त्यांच्या अपमानाबाबत ठाकरे यांनी हात जोडून या राज्यांंसह संपूर्ण उत्तर भारताच्या जनतेची जाहीर माफी मागावी. माफी मागितल्याशिवाय त्यांना अयोध्येत घुसू देणार नाही, असा इशारा भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी दिला आहे.

राज ठाकरे यांनी ५ जून रोजी अयोध्या दौरा जाहीर केला आहे. राम मंदिर आंदोलनाशी ठाकरे परिवाराचा काही संबंध नाही व त्यांना याचे देणेघेणे नाही असाही हल्लाबोल ब्रिजभूषण यांनी केला असून जोवर ठाकरे उत्तर भारतीयांच्या लोकांची माफी मागत नाहीत तोवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांना किंवा ठाकरे परिवारालाही अजिबात भेटू नये असेही त्यांनी आवाहन केले आहे. सिंह हे केसरगंज, अयोध्या भागातील प्रभावी खासदार मानले जातात. उत्तर प्रदेशात मशिदींवरील भोंगे उतरविल्याबद्दल राज ठाकरे यांनी आदित्यनाथ यांचे नुकतेच जाहीर कौतुक केले होते.

Prakash Harale: