पुणे : साईनाथ रुग्णालयात उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या डोक्यावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा हात मायेने फिरला…घाबरू नको, लवकर बरी हो म्हणत हातातले चॉकलेट विद्यार्थीनीच्या हातात दिले आणि काही क्षण आपल्या वेदना विसरून तिच्या चेहऱ्यावर हसू फुललं. शाळेने दिलेले संस्कार न विसरता तिने याही स्थितीत ‘थँक यू’ म्हटलं आणि जिल्ह्याचे पालकत्व सांभाळणाऱ्या मंत्री चंद्रकांत पाटील यांनाही विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील हे हास्य आणि त्यांचे दोन शब्द सुखावून गेले.
आंबेगाव तालुक्यात गिरवली बस दुर्घटनेतील जखमी विद्यार्थ्यांची श्री.पाटील यांनी साईनाथ रुग्णालयात भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. जखमींना उत्तमोत्तम उपचार करण्याच्या व आवश्यक आरोग्य सुविधा पुरविण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
आयुकाची दुर्बिण पाहण्यासाठी गेलेल्या पिंपळगाव घोडे येथील मुक्ताई प्रशालेच्या बसचा मंगळवारी अपघात झाला. दुर्घटनेत किरकोळ जखमी विद्यार्थ्यांना उपचारांती पालकांकडे सोपविण्यात आले होते. पालकमंत्री पाटील यांनी जखमी विद्यार्थीनी आणि चालकाची भेट घेऊन त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना धीर दिला.
जखमींवर चांगले उपचार करण्याबाबत डॉक्टरांशी चर्चा केल्यामुळे कुटूंबियांना आधार मिळाला. उपचाराचा खर्च राज्य सरकार करणार आहे. या निर्णयामुळे कुटूंबियांना आलेला ताण हलका होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना ‘खावू’देऊन त्यांना होत असलेल्या वेदनांवर आनंदची फुंकर घातली. त्यांनी विद्यार्थ्यांशी प्रेमळपणे संवाद साधतांना त्यांना धीर दिला आणि सोबत चॉकलेटही दिले. ती आवडीची भेट पाहून क्षणभर त्या विद्यार्थीनीही आपल्या वेदना विसरल्या. पालकांना चिंता करू नका अशा शब्दात धीर दिला. डे, ताराचंद कराळे आदी उपस्थित होते.