वीज भारनियमनविरोधात भाजपचं पुण्यात हातपंखा आंदोलन

पुणे : महाराष्ट्रात मागील अनेक दिवसापासून वीज भारनियमन सुरु आहे . यामुळे सर्वसामान्य नागरिक शेतकरी त्रस्त झाले आहेत त्यामुळे भाजपाने आज पुण्यातील रास्ता पेठेत हातपंखा आंदोलन करत महविकास आघाडीचा निषेध केला आहे .

अदानी आणि टाटा या वीज उत्पादन कंपन्यांविरोधात राज्य सरकाराने कारवाईचा पवित्रा घेतल्यानंतर काल दोन्ही कंपनीनी वीज वितरण पुरवठा पूर्वीप्रमाणे सुरु केल्याने सरकारला दिलासा मिळाला आणि विजेची मागणी ,पुरवठ्यातील तफावत कमी असल्याने टप्प्याने वीज भारनियमन कमी करण्यात येईल असं ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले. पण तरीही भाजपकडून जोरदार आंदोलन करण्यात आले आहे.

आंदोलनादरम्यान भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी इशारा दिला की , वीज भारनियमनामधून लवकरात लवकर सर्वसामान्य जनतेला मुक्त केले नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू . तसेच जेव्हापासून महाविकास आघाडी सरकार आले , तेव्हापासून राज्यातील जनता सुखी ना असा टोला हि त्यांनी दिला .

Nilam: