भाजपचं मिशन २०२४ लोकसभा सुरु? वाचा सविस्तर

नवी दिल्ली : २०२४ च्या लोकसभा निवडणुकाला (2024 Lok Sabha Election) आणखी दोन वर्षाचा कालावधी असला तरी, भारतीय जनता पक्षानं (BJP) आतापासूनच तयारी करायाला सुरुवात केली आहे. मोदी सरकारला काही दिवसातच ८ वर्षे पुर्ण होत आहेत. या पार्श्चभुमीवर आयोजित कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (J. P. Nadda) यांनी असे आदेश दिले आहेत. त्याबरोबर भाजपनं अनेक मंत्र्यांना सक्रिय होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पक्षातील केंद्रीय मंत्र्यांना देशभरात १४० पेक्षा अधिक संघास भेटी देण्यास सांगितले आहे. मागिल लोकसभा निवडणुकीत पक्षाचा उमेदवार पराभूत झालेल्या आहे, त्या मतदार संघात जास्त लक्ष घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या सर्व ठिकाणी मंत्री जाणार असून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

दरम्यान, पक्षातील प्रत्येक आमदाराला आमदार-२५ बुथ तर खासदाराला-१०० कमकुवत बुथची जबाबदारी देण्यात आली आहे. २५ मे ते ३१ जुलै या कालावधीत बुथ पातळीवर बळकटीकरण मोहिम (Booth level strengthening campaign) राबवण्यात येणार आहे. या सर्व नेते मंडळींना पक्षाचे किमान दहा कार्यकर्त्ये मदत करतील, अशा प्रकारे ७७,८०० बुथ सक्रिय होतील आणि पक्षाला आणखी बळकटी देण्याचा प्रयत्न असणार आहे. ज्या राज्यात पक्षाला जास्त विस्ताराची गरज आहे, तिथे चार प्रमुख नेत्यांची एक टिम सूत्र घेऊन पक्ष मजबुतीकरण मोहिम राबवेल. या मोहिमेत सरकारी योजना आणि त्या योजनांची अंमलबजावणी हा प्रमुख मुद्दा असणार आहे.

Prakash Harale: