मुंबई : (Shivsena Leader Bhaskar Jabhav On BJP) सध्या राज्यसभा निवडणूकीच्या निमित्ताने शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये चांगलेच आरोप-प्रत्यारोप पहायला मिळत आहे. त्यात आता शिवसेना नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी भाजपावर सडकून टीका केली आहे. भाजपनं संभ्रमाचं वातावरण निर्माण केलं आहे. तसंच भाजपाच्या हवेत उडणाऱ्या विमानाचं संध्याकाळी ‘लँडिंग’ होईल, असं म्हणत जाधव यांनी भाजपाला खोचक टोला लगावला.
दरम्यान, आता एकदंर जे चित्र दिसतं आहे त्यातून आमदारांमध्ये आणि जनतेमध्ये भाजपाबद्दल असंतोष आहे. तो असंतोष संध्याकाळी मतमोजणीच्या निमित्ताने स्पष्ट होईल. विधान परिषद निवडणूकीत सुद्धा भाजपाने आपल्या मतांच्या कोट्यापेक्षा अधिक उमेदवार भाजपनं स्वतःचं हस्य करुन घेतले आहे .
पुढे बोलताना ते म्हणाले, भाजपची बी टीम कोण, सी टीम कोण हे अख्ख्या देशाने पाहिलं आहे. त्यामुळे भाजप कोणाबद्दल काहीही बोलली तरी त्यांच्या शब्दाबद्दल विश्वासार्हता राहिलेली नाही. भाजप नेते काय बोलतंय याकडं जास्त लक्ष देण्याची गरज नाही, असं मत भास्कर जाधव यांनी व्यक्त केलं.