राज ठाकरेंना पुण्यातील पुरोहितांकडून मंत्रोच्चाराद्वारे आशीर्वाद

पुणे : उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे सभा होणार आहे. गेल्या काही दिवसापासून भोंगा प्रकरणावरून मनसे आणि शिवसेना यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनी म्हणजे १ मे रोजी औरंगाबाद येथे सभा घेणार असल्याचं जाहीर केल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षाचे लक्ष आहे.

राज ठाकरे यांचं कालच पुण्यातील राज महाल येथील निवासस्थानी आगमन झाले आहे . तर आज १० वाजण्याच्या सुमारास औरंगाबादच्या दिशेने ते रवाना होणार आहेत.परंतु त्याआधी राज ठाकरे यांना पुण्यातील १०० ते १५० ब्राह्मणांकडून चारही वेदांमधील मंत्रोच्चाराद्वारे आशीर्वाद दिला जाणार आहे. याविषयी गुरुजी मनोज पारगावकर म्हणाले कि, राज ठाकरे यांना दीर्घ आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य प्राप्त व्हावे. उद्या होणाऱ्या सभेमध्ये त्यांना यश मिळो त्यांची जी हिंदूजननायकाची भूमिका आहे.त्यासाठी त्यांना चारही वेदांमधील मंत्रांचा आशीर्वाद आम्ही पुरोहित वर्गाच्या वतीने आशीर्वाद देणार आहोत असं त्यांनी म्हटलं.

तसंच ३ मे रोजी पुण्यातील सर्व मंदिरात महाआरतीचे आयोजन रमजान ईद आणि अक्षय्य तृतीयेच्या निम्मिताने मनसे कार्यकर्त्यांकडून करण्यात आले आहे. यासाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल त्यांच्या संलग्न असलेल्या सात ते आठ संघटनांनी यासाठी पाठिंबा दर्शविला आहे.

Nilam: