BMC चा शिवसेना आणि शिंदे गटाला दणका; ‘या’ कारणामुळे दसरा मेळाव्याची परवानगी नाकारली!

मुंबई : (BMC denied permission to Shivsena and Shinde group) दिन महिन्यापुर्वी एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या 40 आमदारांसह पक्षाविरुद्ध बंड पुकारलं. तेव्हापासून शिवसेना Shivsena आणि शिंदे गट Shinde Group यांच्यात रस्सीखेच पहायला मिळत आहे. दादर येथिल शिवाजी पार्कवर होणारा दसरा मेळावा Dasra Melava कोणाचा होणार यावर गेल्या महिनाभरापासून वाद सुरु होता त्याला आता पुर्णविराम मिळाला आहे.

दरम्यान, मुंबई महापालिकेकडे BMC शिवसेना आणि शिंदे गटाने शिवतीर्थावर दसरा मेळाव्यासाठी परवानगी मागितली होती. त्यावर आज पालिका उप-आयुक्त यांनी लेखी उत्तर दिलं आहे. यामुळे दोन्ही गटाला जोराचा झटका बसला आहे. शांतता आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरुन परवानगी नाकारली असल्याचं मुंबई महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे.

शिवाजी पार्कवरील Shivaji Park दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेनं उच्च न्यायालयात High Court धाव घेतली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. दरम्यान, मुंबई पालिकेनं Mumbai दोन्ही गटांना परवानगी नाकारली आहे. त्यामुळे शिवाजी पार्क दसरा मेळाव्याला कुणालाच मिळणार नाही हे स्पष्ट झाले असले तरी, कोर्ट काय भुमिका घेत याकडे सर्व राज्यासह देशाचे लक्ष लागले आहे.

Prakash Harale: