मुंबई : बॅालिवूड अभिनेत्री कंगना रनौत पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहे. कंगनाचा बहुचर्चीत सिनेमा ‘धाकडचा’ टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. गेले अनेक दिवस प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा सिनेमा 20 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘धाकडचा’ टीझर प्रदर्शित होताच तो प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस पडताना दिसत आहे. या टीझरमध्ये कंगना अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे. तसंच रिपोर्टनुसार कंगना या सिनेमात सात वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. त्याचबरोबर ‘धाकड’ हा सिनेमा हिंदीसह, तमीळ, तेलुगू आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे.