बॉलिवूड अभिनेत्री उघड केले बॉलिवूडचे घाणेरडे सत्य; म्हणाली …

मुंबई : फिल्मइंडस्टरी मध्ये जिने स्वतःच्या मेहनतीने आणि अभिनयाने आपली ओळख निर्माण केली ती बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमला (yami gautam). नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत तिने बॉलिवूडच्या विश्वाबद्दल खळबळजनक खुलासे केले आहे. तिने बी-टाऊन, फेरेन लवली अशा जाहिरातीमध्ये झळकली असून अनेकांच्या पसंतीस उतरली आहे.

यामी गौतम सांगितले की, तिला कोणताच गॉडफादर नव्हता. चित्रपटसृष्टीत काम करणं तिच्यासाठी सोप्पी गोष्ट नव्हती. तिने अनेक चित्रपट केले. त्यातील अनेक चित्रपटांमध्ये तिला स्वतःच्या मनाविरुद्ध काम करावे लागले.कारण तिला सांगण्यात आलं होत की, ‘तुम्ही नजरेतून बाहेर पडाल’, तेव्हा माझ्याकडे पर्याय नव्हता.त्यावेळीच ६-७ वर्षांपूर्वीचा काळ माझ्यासाठी सोपा नव्हता.”असं तिनं मुलाखतीदरम्यान सांगितलं आहे.

तसंच यामीने सांगितले की, तिला अशा काहीच निवडक अभिनेत्यासोबतच चित्रपट देण्यात येत होते. आणि काही निवडकच अभिनेतेच तिला चित्रपट देत होते. अश्या जास्त गाणी असलेल्या चित्रपटामध्येच तिला काम करावं लागत होतं. यामुळे तिने बॉलिवूडच्या काही गोष्टींबद्दल तिने खळबळजनक विधान केलं आहे.

Nilam: