कियारा अडवणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगल्या आहेत. या दोघांना पार्टी, सार्वजनिक ठिकाणी अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. आता कियारा-सिद्धार्थ लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. ते लवकरच त्यांच्या लग्नाची तारीख जाहीर करू शकतात.
अथिया शेट्टी आणि केएल राहुल हे रिलेशनशिपमध्ये असून त्यांच्या नात्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे. तसंच ते दोघंही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.
तारा सुतारिया ही आधार जैनसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. त्या दोघांना अनेकदा एकत्र स्पाॅट करण्यात आलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार तारा आणि आधार पुढच्या वर्षी लग्न करणार आहेत.
क्रिती खरबंदा आणि पुलकित सम्राट हे दोघं क्यूट कपलपैकी एक आहेत. आता चाहते देखील त्यांच्या लग्नाची वाट पाहत आहेत.
काही महिन्यांपूर्वी मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांनी आपलं नातं सर्वांसमोर जाहीर केलं होतं. अरबाज खानसोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अर्जुनसोबत रिलेशनशिपमध्ये आली. तसंच ते दोघंही लवकरच लग्न करणार आहेत.
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल हे दोघंही लोकप्रिय कपलपैकी एक आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, ते दोघं पुढच्या वर्षी लग्न करणार आहेत.