पुणे रेल्वे स्थानकावर बॉम्बसदृश्य वस्तू, प्लॅटफॉर्म ब्लॉक; मोठा फौजताफ़ा तैनात

पुणे : पुणे रेल्वे स्टेशनवर सकाळी पाउणेअकराच्या सुमारास एक बॉबसदृश्य वस्तू आढळली आहे. ही वस्तू स्फोटकांचा स्वरूपातील असल्याने ती निकामी करण्यासाठी बॉम्ब शोधक व बॉम्बनाशक (बिडीडीएस) पथकाने बी जे वाद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानात नेण्यात आली आहे.

पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला सकाळी पावणे अकरा वाजता पुणे रेल्वे स्थानकावर बॉम्ब आढळल्याची माहिती मिळाली. त्यानंतर नियंत्रण विभागाकडून याबाबत तत्काळ बंडगार्डन पोलिस, बॉम्ब शोधक पथक यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर, पुणे पोलिस, रेल्वे पोलीस, जीआरपीएफ, आरपीएफ, अग्निशामक दल स्थानकावर दाखल झाले. त्यांनी तत्काळ रेल्वे स्थानक मोकळे करून रेल्वे स्थानकावर येणाऱ्या रेल्वे गाड्या देखील थांबवण्यात आल्या. रेल्वे स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी परिसरात ही बॉम्बसदृश वस्तू सापडली आहे. ही स्फोटके नक्की कोणत्या स्वरुपाची आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

बॉम्बनाशक (बिडीडीएस) पथकाने बी जे वाद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानात नेण्यात आली आहे.

बॉम्ब शोधक पथक दाखल झाल्यांनतर त्यांनी स्थानकावरील फलाट नंबरच्या जवळ एक संशयास्पद वस्तू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनतर बिडीडीएसने तपासणी करून तीन जिलेटीन कांड्यासह वस्तू असल्याचं सांगितलं. मात्र आयुक्तांनी अजून याला दुजोरा दिलेला नाही. बिडीडीएसने त्या कांड्या आपल्या ताब्यात घेऊन त्या निकामी करण्यासाठी बी जे वाद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानात नेण्यात आल्या.

Dnyaneshwar: