मुंबई | देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani), बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि धर्मेंद्र (Dharmendra) यांच्या घरांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. उद्योजक मुकेश अंबानी यांचा बंगला अँटिलिया येथे स्फोट होणार असल्याचे नागपूर पोलीस नियंत्रणाला एका अज्ञात व्यक्तीने फोनवरून सांगितले. याशिवाय अमिताभ आणि धर्मेंद्र यांच्या घरीही स्फोट होणार असल्याचे कॉलरने सांगितले. त्यानंतर बॉम्ब स्क्वॉडला बिग बी आणि धर्मेंद्र यांच्या घरी पाचारण करण्यात आलं. घर आणि घराजवळील परिसराची पूर्ण तपासली केली असता त्यांना काहीच सापडलं नाही.
25 लोक दादरला पोहोचले असून ते हल्ल्याची प्लॅनिंग करत आहेत, अशीही धमकी त्या अज्ञात व्यक्तीने पोलिसांना दिली होती. या फोन कॉलनंतर नागपूर पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांच्याशिवाय मुकेश अंबानी यांचंही घर बॉम्बने उडवण्याची धमकी दिली होती.
मुकेश अंबानींना धमकी मिळाल्याची ही काही पहिलीच घटना नाही. याआधी ऑगस्ट 2022 मध्येही अँटिलिया बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. 2021 मध्ये मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर एक संशयास्पद स्कॉर्पिओ गाडी उभी होती. सुरक्षा कर्मचाऱ्यांना संशय आल्यानंतर त्यांनी पोलिसांना बोलावलं. नंतर तपासादरम्यान त्या गाडीत जिलेटिनच्या काड्या ठेवण्यात आल्याचं निष्पन्न झालं होतं.
अंबानी कुटुंबाला परदेशातही Z+ सुरक्षा
कालच, सर्वोच्च न्यायालयाने उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबातीला देशभरात आणि परदेशात सर्वोच्च दर्जाची Z+ सुरक्षा देण्याचे करण्याचे आदेश दिले आहेत.