Ayodhya ram mandir :
अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या अश्या अयोध्येच्या राम मंदिराचे लोकार्पण सोहळा 24 जानेवारी 2024 होणार आहे. त्यातच आता चिंताजनक बाब समोर आली आहे. अयोध्येच्या राम मंदिरात बॉम्बस्फोट होणार असल्याची धमकी आली आहे. अनेक वर्षाच्या संघर्ष नंतर अयोध्येत राम मंदिर उभारण्यात येत आहे आणि त्याच मंदिरात अशी धक्कादायक गोष्ट होणार असल्याच एका बरेलीतील विद्यार्थ्याने सूचना दिली आहे.
येत्या 21 सप्टेंबर रोजी राम मंदिरात बॉम्बस्फोट होणार असल्याची धमकी देण्यात आली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या 112 या फोनवर धमकीची सूचना देण्यात आली आहे. या धमकीच्या माहितीनंतर उत्तर प्रदेश पोलीसच नाही तर केंद्रीय एजन्सीमध्येही खळबळ उडाली आहे. माहिती देणारा विद्यार्थी मंगळवारी यूट्यूबवर व्हिडिओ पाहत बसला होता त्यातील एका व्हिडिओमध्ये अयोध्येचे राम मंदिर उडवण्यात येणार आहे असा व्हिडिओ त्यांनी पहिला आणि या व्हिडिओ बद्दल माहिती पोलिसांना द्यावे असे त्याच्या मनात आले आणि त्याने अयोध्येच्या पोलिसांना ही माहिती कळवली त्यांनतर लगेच अयोध्येच्या पोलीस प्रशाशनाणे अयोध्येमध्ये हाय अलर्ट जारी केला.
कंट्रोल रुमला फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला गेला. चौकशी केली असता हा फोन कॉल बरेली येथील फतेहगंज पूर्व येओथील इटौरी गावातून हा फोन आल्याचं समजलं. त्यानंतर पोलीस या पत्त्यावर पोहोचले. तिथे गेल्यावर फोन करणारा दुसरा तिसरा कोणी नसून आठवीचा विद्यार्थी निघाला. त्यानंतर पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन त्याची चौकशी केली. त्यावेळी त्याने यूट्यूबवर हा धमकीचा व्हिडीओ पाहिल्याचं त्याने सांगितलं.
बरेलीतील या मुलाने कंट्रोल रुमला फोन लावून फक्त अयोध्येतील राम मंदिरात २१ सप्टेंबरला बॉमस्फोट होणार आहे एवढंच बोलून फोन ठेऊन दिला त्याच्या अश्या फोन ठेवण्यामुळे पोलिसांना आणखीन संशय आला, त्यांनतर आता त्या यूट्यूब व्हिडिओची तपासणी पोलीस करत आहेत.