मुंबईतील ५० हून अधिक रुग्णालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी; पोलीस यंत्रणा सतर्क

मुंबईतील ५० हून अधिक रुग्णालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबईतील ५० हून अधिक रुग्णालये, महाविद्यालये आणि बीएमसी मुख्यालयात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणारे ईमेल पोलीस यंत्रणेला मिळाले आहेत. ईमेल मिळाल्यानंतर मुंबईत आज खळबळ उडालीय. मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की, मुंबईतील अनेक प्रसिद्ध रुग्णालयांमध्ये धमकीचे ईमेल आलेत. ईमेल पाठवणाऱ्याने आपल्या ईमेलमध्ये दावा केला आहे की, रुग्णालयांच्या बेड आणि बाथरूमच्या खाली बॉम्ब ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, धमकीचा ईमेल पाठवणाऱ्याने आपली ओळख लपवण्यासाठी व्हीपीएन नेटवर्कचा वापर करून सर्व ईमेल पाठवले आहेत. हा ईमेल जसलोक हॉस्पिटल, रहेजा हॉस्पिटल, सेव्हन हिला हॉस्पिटल, कोहिनूर हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल, जेजे हॉस्पिटल, सेंट जॉर्ज हॉस्पिटल आणि मुंबईतील इतर हॉस्पिटलमध्ये आल्याचेही सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा- आयएएस अधिकारी तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली

प्राथमिक तपासादरम्यान मुंबईतील अनेक नामवंत रुग्णालयांना त्यांच्या ईमेल आयडीवर हे धमकीचे ईमेल आल्याचे मुंबई पोलिसांना समोर आले आहे. Beeble.com नावाच्या वेबसाइटचा वापर करून धमकीचा ईमेल पाठवण्यात आला आहे. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, धमकीचा ईमेल एकाच ईमेलमध्ये लिहून ५० हून अधिक रुग्णालयांना पाठवण्यात आला आहे. यानंतर पोलीस आणि बॉम्ब निकामी पथकाने रुग्णालयात जाऊन तपासणी केली असता पोलिसांना कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. धमकीचा ईमेल पाठवणारी व्यक्ती अद्याप सापडली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. असा धमकीचा ईमेल पाठवण्यामागचा हेतू काय होता याचाही शोध पोलीस घेत आहेत.

हेही वाचा- विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणुकीची घोषणा, या दिवशी होणार मतदान!

कॉलेजमध्येही धमकीचे ईमेल 

रुग्णालयांशिवाय मुंबईतील हिंदुजा कॉलेज ऑफ कॉमर्सलाही धमकीचे ईमेल पाठवण्यात आले होते. ईमेल पाठवणाऱ्याने कॉलेजमध्ये बॉम्ब टाकण्याची धमकी दिली होती. धमकीचा ईमेल मिळाल्यानंतर, कॉलेज प्रशासनाने जवळच्या पोलिस स्टेशनला कळवले, त्यानंतर स्थानिक पोलीस आणि बॉम्बशोधक पथकाचे अधिकारी आले आणि तपास केला, परंतु काहीही संशयास्पद सापडले नाही.

हेही वाचा- आरबीआयची मोठी कारवाई! ’या’ बँकेचा केला परवाना रद्द

BMC मुख्यालयाला धमकीचा ईमेल 

केवळ रुग्णालय आणि महाविद्यालयच नाही तर बीएमसी मुख्यालयालाही धमकीचा मेल आला होता. ईमेल करणाऱ्याने मुख्यालय उडवून देण्याची धमकी दिली. पोलिसांनी बीएमसीच्या मुख्यालयात तपास केला पण त्यात काहीही संशयास्पद आढळले नाही. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Rashtra Sanchar Digital:

View Comments (0)