पुस्तक जगतात : शिवनेत्र बहिर्जी – प्रेम धांडे

महाराष्ट्रातील वाचकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलेली Best Seller कादंबरी शिवनेत्र बहिर्जी या पुस्तकाची नवीन आवृत्ती नव्या रुपात आता वाचकांसाठी उपलब्ध..!!

महाराष्ट्राची अस्मिता असणार्‍या शिवरायांची अदृश्य शक्ति बहिर्जी नाईक यांच्या संपूर्ण आयुष्याचा, त्यांच्या शिव प्रेमाचा आणि स्वराज्याच्या बांधणीत पदोपदी असणार्‍या त्यांच्या अमूल्य योगदान चा शब्दरुपी प्रवास घडवणारी पहिली कादंबरी. शिवबांच्या वेचीव मावळ सेनेचा, बुद्धिमान दौलतराव (बहिर्जी ) एक भाग बनला आणि मग स्वराज्य निर्माणाची दिशा ठरली, गती द्विगुणित झाली. पण या हिऱ्याला राजांनी कसं शोधलं असावं? जिजाऊसाहेबांचा आशिष, शिवाज्ञा आणि भावनांवर विजय मिळवून संकल्पित कार्याला झोकून देणार्‍या या गुप्तहेराला किती तरी त्याग करावे लागले असतील! खरं नाव दौलतराव तर मग बहिर्जी नावाच्या मागचे खरं गूढ, पण मार्मिक, आणि राजांच्या राजनीतीचं दर्शन घडवणारं रहस्य काय असेल? संपूर्ण विश्वासमोर आदर्श बनून राहिलेल्या गुप्तहेर संघटनेची रचना, उद्देश नियम, कार्यप्रणाली कशी असेल? आणि या संघटनेत एकाच वेळी हजारो गुप्तहेर कसे कार्यरत असतील? आणि असतील तर कसा असेल त्यांचा जीवनप्रवास? स्वराज्याचा हेर म्हणवून घेण्यासाठी काय गुण असतील त्यांच्यात? स्वराज्याच्या महान कार्याशी कसं जोडलं गेलं असेल एकेकाचं अतूट नातं? फतेहखानाविरुद्ध झालेल्या लढाईत, स्वराज्यावर झालेल्या पहिल्या आक्रमणात, महाराजांचा तिसरा डोळा म्हणून ओळखल्या जाणार्‍या या नाईकांची नेमकी काय भूमिका असेल?
बहिर्जी पथकात पहिली महिला हेर सामील झाली…नाईकांच्या चाणाक्ष नजरेनं तिची योग्यता कशी पारखली असेल? हेरगिरी करण्याच्या इतक्या जोखीम असलेल्या कामात तिने स्वतःला कसं वाहून घेतलं असेल? इतिहासाच्या डायरीमध्ये दुर्लक्षित राहिलेलं एक काळं पान…. ज्यानं कोणाच्याही नकळत इतिहासाची दिशाच बदलली असती, ज्याच्या कुटीलपणामुळं स्वराज्याचा मोठा शत्रू असलेली आदिलशाही संपली असती पण तरीही राजांनी त्यालाच अडवलं…. पण कोण होता तो आणि राजांनी असं का केलं असावं? अशा किती तरी उत्सुकता शीगेला नेणाऱ्या प्रश्नांची उत्तरं देणारी कादंबरी गनिमी कावा करून जिंकलेल्या युद्धांचा, राजांनी केलेल्या पेठांच्या लुटींचा, आदिलशाहाच्या कैदेच्या विळख्यात अडकलेल्या शहाजीराजांची मोठ्या चतुराईनं राजांनी केलेल्या सुटकेचा इतिहास आपण नेहमीच अभिमानानं वाचला…. पण त्या इतिहासातील घटनांत राजांच्या पावलाच्या आधी पाऊल टाकून बहिर्जी पथकाने केलेल्या खऱ्या गनिमी काव्याची ओळख करून देणारी ही कादंबरी. इतिहासानं दडलेल्या बहिर्जी नाईकांच्या व्यक्तित्वाला, त्यांचे उल्लेख सहजपणे मिळत नसताना ही शोधून काढत, अविरत अभ्यास, अमोघ लिखाण आणि विशाल कल्पनाशक्तीनं शब्दरूपात जिवंत करणारी आणि वाचताना मराठी मनात अभिमान आणि कौतुकाची सोनेरी छटा पसरवणारी कादंबरी.

Dnyaneshwar: