पुण्यात ‘ब्रेक फेल’ एसटीची सात गाड्यांना धडक

पुणे : सातारा रस्त्यावर हॉटेल रविकांत जवळ ‘ब्रेक फेल’ एसटीने सात गाड्यांना धडक दिली आहे. ब्रेक फेल झाल्यामुळे एसटीने पाच ते सात गाड्यांना धडक दिली. यामध्ये अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, चारचाकींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तसेच एसटीही फुटली आहे.

पुण्यातील शंकर महाराज उड्डाणपुलावर ही दुर्घटनाल घडली आहे. अपघातात बसखाली काही दुचाकी देखील आल्या आहेत. या गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं समोर आले आहे. यावर स्थानिक पोलिसांनी तत्काळ धाव घेत वाहतूक मार्गी लावण्यास सुरुवात केली. या दुर्घटनेमुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.

अपघातात तीन जण जखमी झाल्याचं कळतंय. तर, जखमींना भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळी वाहतूक पोलीस व भारती विद्यापीठ पोलीस परिस्थिती नियंत्रणात आणत आहेत. पुढील माहिती पोलिस करत आहेत.

Prakash Harale: