आजकाल तरुणांना सर्वात जास्त प्रमाणात कमी वयातच पांढऱ्या केसांची समस्या जाणवत आहे. मग आपण म्हातारे दिसू की काय असे अनेक प्रश्न युवकांच्या मनात गोंधळ घालत असल्याचं पाहायला मिळत. यामुळे अनेक युवक बाजारात मिळणारी वेगवेगळी उत्पादने खरेदी करून आपल्या केसांना लावतात. तर काही लोक तीच पांढरे झालेले केस हाताने तोडून काढतात. यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यामुळे तुम्ही जर अशा प्रकारे पांढऱ्या केसांमुळे त्रस्त असाल आणि जर पांढरे केस तोडले तर काय परिणाम होईल ते समजून घेऊन त्यावर उपाययोजना केल्या पाहिजेत.
आपण पाहतो की, पांढरे केस तोडण्याचे अनेक तोटे देखील आहेत. जर तुम्ही तुमचे पांढरे केस मुळापासून उपटत आहात तर तुम्ही तुमच्या केसांचे नुकसान करत आहात. कारण केस उपटल्यामुळे केसांच्या मुळावर वेत परिणाम होतो. मूळ कमकुवत होतात. त्या ठिकाणचे इतर केस देखील पांढरे होऊ शकतात. तसच त्या ठिकाणी नवीन केस उगवू शकत नाहीत. आपल्या डोक्यातील केस पातळ होऊ लागतात मग टक्कल पडत जातो. यामुळे केस उपटणे हा पांढरे केस होणु नयेत यावरील उपाय नाही. आपण पोष्टिक आणि सकस आहार घेतला पाहिजे. अनेक वेळा पाणी बदलल की केसांवर त्याचा परिणाम होत असतो. ताणताणाव , बदलती जीवनशेली, केसांना वेगवेगळी क्रीम लावणे. यामुळे केस पांढरे होऊ शकतात.
तर यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासाठी दररोज योग, व्यायाम, पोष्टिक आहार,पालेभाज्या ,फळ, दुध अशा प्रकारे पदार्थ असणे आवश्यक आहे. तसच घरगुती उपाय ही केल्यामुळे तुमच्या केसांचा पांढरेपणा कमी होऊ शकतो. यामध्ये
आवळा आणि मेथी दाणे, काळा चहा, बदामाचे तेल आणि लिंबाचा रस, मेहंदी आणि कॉफी, कढीपत्ता आणि तेल, जवस तेल अशा प्रकारे घरी बनवलेले तेल आपण वापरू शकतो. या तेलानी केसांच्या मुळापासून मालिश केल्याने केसांची वाढही होत असते.