मुंबई : (Brijbhushan sing On Shivsena) विधानसभेच्या निवडणूका एकत्र लढवून भाजपच्या पाठित खंजीर खुपसून काॅंग्रेस, राष्ट्रवादीचा हात धरला. बंडखोर एकनाथ शिंदे यांच्यामुळे शिवसेनेची नाचक्की झाली. सेनेचे ५५ तब्बल पैकी ३९ आमदार शिवसेनेची साथ सोडून शिंदे गटात सामील झाले. सोमवार दि. २१ रोजीपासून राज्यातील सत्तानाट्याची देशभरात चर्चा आहे. सूरत नंतर गुवाहाटी येथे गेलेल्या तब्बल ५१ आमदारांमुळे ‘मविआ’सरकार अडचणीत आले आहे.
दरम्यान, या सर्व घडामोडींवर वेट अॅंन्ड वाॅच ची भुमिका घेतलेल्या भाजप नेत्यांनी बोलायला सुरुवात केली आहे. त्यातच आता अयोध्या दौऱ्यावरुन राज ठाकरेंना खांद्यावर घेणारे भाजपचे खासदार बृजभूषण सिंह ठाकरे-शिंदे वादात उडी घेतली आहे. ते म्हणाले, ज्यांनी भाजपसोबत धोका केला आज त्यांच्यासोबत ही तेच घडत आहे.
पुढे ते म्हणाले, भाजपसोबत एकत्र निवडणूका लढवल्या, मात्र, सत्तास्थापनेच्या वेळी भाजपच्या पाठित खंजीर खुपसून काॅंग्रेससोबत हात मिळवणी केली. सत्तेसाठी बाळासाहेबांचा जो नारा होता त्याच्याविरोधात गेलात. जे भाजपसोबत उद्धव ठाकरेंनी केले तेच शिवसैनिक आता त्यांच्यासोबत करत आहेत. भाजपशी पंगा घेतला आणि शिवसेनेचं अस्तित्व संपत आले आहे. ठाकरेंनी लवकर पंतप्रधान मोदी यांना शरण यावे अन्यथा सेनेचे अस्तित्व उरणार असा जहरी टोला त्यांना लगावला आहे.