अर्थसंकल्प सादर होताच शेअर मार्केटमध्ये उसळी; पहा सेन्सेक्समध्ये किती अंकांची वाढ?

India Budget 2023 | अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Nirmala Sitharaman) यांनी 2023-24 चा अर्थसंकल्प ( Budget 2023) सादर केले आहे. या अर्थसंकल्पात सगळ्यांनाच दिलासा मिळाला आहे. शेअर मार्केटमध्ये (Share Market) सुद्धा सकारात्मक चित्र पहायला मिळाले आहे. अदाणी समूहावर झालेल्या आरोपामुळे सोमवारपासून शेअर मार्केटमध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळाली.मात्र आज सकाळपासूनच बाजारात तेजी दिसून आलीये. गेल्या काही दिवसांत 60 हजाराच्या खाली आलेला सेन्सेक्स (Sensex) थोड्यावेळापूर्वी 60 हजारांच्या वर गेलेला पाहायला मिळतोय. अर्थसंकल्पीय भाषण संपेपर्यंत यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता दर्शवली जातेय. मागच्या दहा वर्षात सादर केलेल्या अर्थसंकल्पावेळी फक्त दोन वेळा सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये दोन टक्क्यांहून अधिकची वाढ पाहायला मिळालेली होती.

निर्मला सीतारमन यांनी भाषणाची सुरुवात करताच पहिल्या 10 मिनिटांतच 600 अकांनी सेन्सेक्सची वाढ झालेली दिसून आली. मागील 10 वर्षांपासूनचा मार्केट ट्रेंड लक्षात घेता पूर्ण अर्थसंकल्पातून सहा वेळा सेन्सेक्समध्ये चढउतार झालेला आपल्याला पाहायला मिळाला. तर सहा वेळा सेन्सेक्स कोसळला होता. या अर्थसंकल्पात निफ्टी (Nifty) देखील एक टक्क्याने वाढला आहे. सेन्सेक्सप्रमाणेच नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टीमध्ये 237 अंकाची वाढ पाहायला मिळाली आहे. सर्वच सेक्टरच्या शेअर्ससमोर आज हिरवा रंग झळकून दिसत आहे.

Dnyaneshwar: