नकाशावर रस्ता नसताना तेथे रस्ता कसा? बिल्डरकडून सदनिकाधारकांची चक्क फसवणूक!

बाणेरPUNE CITY NEWS | पुणे महानगरपालिका २०१६ मंजूर केलेल्या नकाशानुसार बिल्डरने सदनिका खरेदी करून दिल्यानकाशात त्यावेळी चिल्ड्रेन प्ले एरिया आहे. नकाशावर रस्ता नसताना तेथे रस्ता कसा. पहिल्या सर्व्हे नंबरमध्ये नंतरचा सर्व्हे नंबर एकत्र कसा आला? यात बिल्डर गौतम पाषाणकर आणि इतर लोकांनी फसवणूक केल्याचे दिसत आहे.

बाणेर येथील यशट्वीन टॉवर्स हाऊसिंग सोसायटी २०२१-२२ मध्ये बिल्डरने हस्तांतरित केली. यानंतर महानगरपालिकेची नोटीस मिळाल्यानंतर गंभीर बाब उघडकसि आली. बिल्डर गौतम पाषाणकर आणि आर्किटेक्ट विकास अचलकर व अन्य साथीदारांनी २०१९ मध्ये बिल्डींगच्या एरियामध्ये काही बदल केले. जसे चिल्ड्रेन प्ले एरिया नसून, शेजारील प्लॉटधारकांचा हा रस्ता आहे. नियमाविरोधात यात बदल करून गौतम पाषाणकर आणि त्यांच्या काही लोकांनी सदनिकाधारकांची फसवणूक केली. हा चिल्ड्रेन प्ले एरिया नसून हा रस्ता आहे, तरी यावरील केलेले बांधकाम तोडण्याची नोटीस या सोसायटीला देण्यात आली.

यश ट्वीन टॉवर्स (A व B बिल्डींग) हाऊसिंग सोसायटी सी सी /२६३५/२०१६ पुणे पालिकेने मंजूर केलेल्या प्लॅन प्रमाणे चिल्ड्रेन प्ले एरियाचे बांधकाम ७/२०१९ मध्ये तर सीमाभिंतीचे बांधकाम २०१४-१५ मध्ये झाले. यात बिल्डरने मंजूर केलेल्या नकाशा व्यतिरिक्त बांधकाम केले नाही. यात मनपाने नोटीस दिली ती बेकायदेशीर आहे. खरेदीमध्ये सदानिकाधारकांना दिलेले प्रमाणपत्र करारनाम्यानुसार आहे. यात नंतर झालेला बदल हा यातील सदनिकाधारकांजवळ नाही. पहिल्या मंजूर केलेल्या नकाशानुसार व नियमानुसारच बांधकाम आहे. रहिवाशांना आणि सदनिकाधारकांना न सांगता तसेच परवानगी न घेता रस्ता मंजूर कसा झाला, याबाबत चौकशी व्हावी.
_आशुतोष पाटील, (सचिव, यश ट्वीन टॉवर्स)

सोसायटीने १० जून रोजी आदेशाच्या विरोधात बांधकाम विभाग झोन तीन यांना एक लेखी तक्रार दाखल केली. बिल्डर व त्यांच्या साथीदारांविरोधात चतुश्रुंगी पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीची तक्रार दाखल केली. बिल्डर पाषाणकर आणि संबंधित लोकांकडून चक्क नकाशात बदल करून सदानिकाधारकांची फसवणूक झाल्याची आणि सोसायटीची जागा हडपण्याचा प्रकार केला जात आहे. इमारतीत ८६ फ्लॅट धारक आहेत.

चिल्ड्रेन प्ले एरिया हा सीसी/२६३५/२०१६ नुसार मनपाने दिलेल्या व मंजूर केलेला नकाशाप्रमाणे यश रियालीटी यांनी फ्लॅट धारकांना २०१६ ते २१ मध्ये खरेदी झालेल्या सदानिकधारकांना २०१६च्या नकाशानुसार खरेदी करून दिला. या सोसायटीच्या सीमाभिंतीचे बांधकाम २०१४-१५ मध्ये झाले. चिल्ड्रेन प्ले एरियाचे बांधकाम बिल्डरने नकाशा मंजुरीनुसार केले होते. बिल्डर गौतम पाषाणकर व अन्य लोकांना हाताशी धरून नकाशात बदल करून चिल्ड्रेन प्ले एरिया व कंपाऊन्ड भिंतीच्या शेजारील प्लॉट धारकांचा जाण्यायेण्याचा रस्ता दाखवून पहिल्या नकाशानुसार खरेदी व त्याचा एरियात बदल करून A व B सदनिकाधारकांची फसवणूक करत असल्याचा प्रकार घडला आहे.

संबंधित लोकांनी संगनमत करून २०१४ साली चिल्ड्रेन प्ले एरिया व कंपाऊन्ड भिंत बांधली असे दर्शविले. त्यानुसार हे अनधिकृत बांधकाम तोडण्याच्या आदेशाची नोटीस ९ जून २०२२ रोजी सोसायटीला बांधकाम विभाग मनपा पुणे कडून बजावण्यात आली. २४ तासांच्या आत हे बांधकाम काढण्यात यावे असे नोटीसमध्ये दिले आहे. प्रत्यक्षात हा रस्ता मंजूर करताना सदनिकाधारकांची महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट अ‍ॅक्ट कलम ७ नुसार लेखी संमती घेणे बंधनकारक असतानाही याची दखल घेतली नाही. परस्पर ५ नोव्हेंबर २०१९ रोजी नकाशात बदल व रस्ता कसा मंजूर केला गेला?

नकाशा बदल करून सदानिका धारकांची फसवणूक केल्याचा प्रकार यामुळे उघडकीस आला आहे. या प्रकारणाची उच्चस्तरीय चौकशी मनपा आयुक्तांकडून करण्यात यावी अशी मागणी होत आहे. पाषाणकर बिल्डरनी जनतेची फसवणूक केल्याबाबत पोलिस स्टेशनच्या कारवाईनुसार ते वाँटेड फरारीसुध्दा आहेत. या बिल्डींगमधील ओपनस्पेस काही सदनिकाधारकांना वाहन लावण्यासाठी पैसे घेऊन विकण्याचा प्रकार बिल्डरने केल्याचे देखील उघडकीस आले आहे. सन १९६३ कायद्यानुसार पार्कींग जागा सोसायटीची असते ती विकता येत नाही.

सायटी होण्याआधी बिल्डर व त्याच्या साथीदाराने सोसायटीचे सर्व बांधकाम कंपाउंडसह दिलेल्या प्लॅननुसारच आहे. पहिल्या नकाशात बदल करून सदनिकाधारकांची फसवणूक करणारे बिल्डर व त्यांच्या अन्य साथीदारांची पोलिसांकडून तसेच महानगरपालिका आयुक्तांनी चौकशी करून यात कोण नक्की काय घडत आहे याची सखोल चौकशी करावी मागणी होत आहे.

Dnyaneshwar: