कणकवलीत खासगी बसचा मोठा अपघात, चौघांचा मृत्यू तर 23 जण जखमी

कणकवली | Mumbai Goa Highway Bus Accident – मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway) कणकवली वागदे पुलानजीक खासगी बसला भीषण अपघात (Bus Accident) झाला आहे. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून 23 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. (Mumbai Goa Highway Bus Accident)

गडनदी पुलावर धोकादायक वळणावर चालकाचा ताबा सुटल्यानं हा अपघात झाला आहे. अपघातग्रस्त खासगी आराम बस मुंबईहून गोव्याच्या दिशेनं जात होती. बसमधून तब्बल 36 प्रवासी प्रवास करत होते. तसंच आता जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Sumitra nalawade: