पोटनिवडणूक जाहीर मात्र, शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा पेच कायम!

मुंबई : (By-Election Voting Andheri Maharashtra 2022) राष्ट्रीय निवडणूक आयोगाने देशभरातील सहा राज्यातील सात विधान सभेच्या जागेच्या पोटनिवडणूका जाहिर केला आहे. यामध्ये मुंबईमधील अंधेरी मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्यामुळे येथे निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.

दरम्यान, देशाभरातील सात जागेवर 3 नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक पार पडणार असून, 6 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. या निवडणूकीमुळे राज्यातील शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हाचा संभ्रम मात्र कायम असल्याचे पहायला मिळत आहे. एकनाथ शिंदेच्या बंडखोरीनंतर राज्यातील ही पहिली निवडणूक असल्याने शिवसेना आणि शिंदे गट यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे.

शिवसेनेकडून दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांच्या नावाची घोषणा केली आहे. शिवसेना कोणाची आणि पक्षचिन्ह कोणाचे हा वाद निवडणूक आयोगाकडे प्रलंबित असताना या शिवसेनेच्या उमेदवाराला पक्षाचे नाव आणि धनुष्याबाण चिन्ह वापरण्यास आयोग काय निर्णय घेत हे पहाणं महात्त्वाचं ठरणार आहे.

Prakash Harale: