उद्या होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख पुन्हा लांबणीवर!

 मुंबई : (Cabinet expansion postponed) शिंदे सरकारला राज्यात मंत्रीमंडळ विस्तार करण्यासाठी काही मुहूर्त मिळता मिळेना झाला आहे. उद्या होणाऱ्या मंत्रीमंडळ विस्ताराची तारीख लांबली असल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी दि. 8 ऑगस्ट रोजी होणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीच्या पार्श्वभुमीवर राज्य सरकार निर्णय घेण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येत आहे.

आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आपापले दिवसभरातले प्रशासकीय सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. फडणवीस आज तातडीने दिल्लीला गेलेमुळे मंत्रिमंडळ विस्तार उद्याच होणार असल्याची माहिती समोर आली होती.  भाजपच्या 8 तर शिंदे गटामधील 7 जणांना मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात, अशी देखील माहिती समोर आली होती. मात्र आता सर्वोच्च न्यायलयातील सुनावणीनंतर विस्ताराबाबत निर्णय मागे घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.  

मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावरुन विरोधकांकडून सरकारवर संधी मिळेल तेव्हा टिका केली जात आहे. सत्ता स्थापन झाल्यानंतर पहिल्या आठवड्यातच मंत्रिमंडळ विस्तार होणे अपेक्षित होते. सरकार स्थापनेला आज 35 दिवस उलटून गेले तरी विस्तार होत नाही त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात नेमकी अडचण काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.  

Prakash Harale: