मुंबई : खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी प्रक्षोभक विधाने करून कायदा व सुव्यवस्था बिघडवल्याप्रकरणी खार पोलिसांनी त्यांना अटक केली असून त्यांच्याविरोधात राजद्रोहाचा (भादंवि कलम १२४ अ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी राणा दाम्पत्याला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान मुंबई पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी राणा दांपत्याने मुंबईत हायकोर्टात धाव घेतली आहे.
राणा दाम्पत्याने मुंबई पोलिसांनी आपल्याविरोधात दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. यावेळी तातडीने सुनावणी घेण्याची विनंती त्यांनी केली असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. तसंच त्यांच्या याचिकेवर २.३० वाजता सुनावणी होणार आहे.