Celina Jaitley : एकेकाळी बॉलिवूडमध्ये सक्रिय असलेली अभिनेत्री सेलिना जेटली तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहे. ती प्रत्येक मुद्द्यावर मोकळेपणाने बोलत असते तसेच सोशल मीडियावर ती बेधडकपणे तिची मतं मांडत असते. नुकतंच एका नेटकऱ्याने सेलिनाबद्दल अत्यंत खालच्या पातळीची टिप्पणी केली. त्यावर तिने सडेतोड उत्तर दिलं आहे. संबंधित युजरने सेलिनाच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित केला होता. विशेष म्हणजे हा युजर स्वत:ला सेन्सॉर बोर्डाचा सदस्य आणि चित्रपट समीक्षक असल्याचं सांगतो. इतकंच नव्हे तर तो स्वत:ला बॉलिवूडच्या अडल्ट गॉसिपचा पत्रकारही म्हणवतो.
उमैर संधू असं या युजरचं नाव असून त्याने याआधीही बॉलिवूडच्या काही सेलिब्रिटींबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. सहसा उमैरच्या ट्विट्सची दखल कोणी घेत नाही. मात्र त्याच्या टिप्पणीने सेलिना चांगलीच भडकली. सेलिनाबद्दल त्याने चुकीची अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला म्हणून तिने बेधडक उत्तर देत त्याचं तोंड बंद केलं.
त्या नेटकऱ्यानं असं म्हटलं आहे की, सेलिना ही एकमेव अभिनेत्री आहे की, जी अभिनेता फरदीन खान आणि त्याचे वडील फिरोज खान यांच्यासोबत अश्लील वर्तन करताना दिसली आहे. सेलिनानं जेव्हा हे ट्विट वाचले तेव्हा तिला संताप झाल्याचे दिसून आले. आणि तिनं त्या नेटकऱ्याला चांगलेच सुनावले आहे.
सेलिनाने तिच्या उत्तरात ट्विटर सिक्युरिटीलाही टॅग केलं असून उमैर संधूविरोधात लवकरात लवकर कारवाई करण्याची विनंती केली आहे. सेलिनाने 2011 मध्ये पीटर हाग याच्याशी लग्न केलं. या दोघांना 11 वर्षांची दोन जुळी मुलं आणि एक पाच वर्षांचा मुलगा आहे. सध्या ती पतीसोबत ऑस्ट्रेलियामध्ये राहते. सेलिना सध्या ग्लॅमरच्या विश्वापासून दूर आपल्या खासगी आयुष्यात मग्न आहे.