मुंबई | Chandrakant Khaire On Navneet Rana – जळगावमध्ये आज (6 सप्टेंबर) खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यातर्फे हनुमान चालीसा पठनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी व्यासपीठावरून बोलताना नवनीत राणा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख आहे. त्यामुळे शिवसैनिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
“तू ठाकरे है तो मैं भी राणा हूं. मी मुंबईची मुलगी आणि विदर्भाची सून आहे. तुम्ही शिवसेनेचे असाल तर मी पण विदर्भाची सून आहे, आमना सामना तर लवकरच होईलच. त्यात कळेल की कोण किती ताकदवान आहे”, अशा शब्दात नवनीत राणांनी उद्धव ठाकरेंचा एकरी उल्लेख करत त्यांना इशारा दिला आहे.
यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून शिवसेनेचे संभाजीनगरमधील नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी देखील नवनीत राणांचा एकेरी उल्लेख करत आक्षेपार्ह शब्दांत टीका केली आहे. “ती बाई म्हणजे तुम्हाला माहितीये चित्रपटात कशी सिगरेट पिते. फोटो कसे काढते. कसे कपडे असतात. ती बाई काय बोलणार? सिगरेट पिऊन दाखवते ती बाई आम्हाला काय शिकवणार? ती बाई हनुमान चालिसाविषयी आम्हाला शिकवते का?”, अशा शब्दांत खैरेंनी प्रश्न उपस्थित केला आहे.