औरंगाबाद | Chandrakant Khaire On Abdul Sattar – एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 40 आमदरांसह बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेत मोठी फुट पडली. त्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गटातील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरू आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी राज्याचे कृषीमंत्री आणि शिंदे गटातील नेते अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्यावर जहरी टीका केली आहे. चंद्रकांत खैरेंनी अब्दुल सत्तारांना हिरवा साप म्हणत त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ते औरंगाबादमध्ये एका सभेत बोलत होते.
यावेळी चंद्रकांत खैरे म्हणाले, “अब्दुल सत्तार म्हणाले की, खैरेंचं काय राहिलं. खैरेंच्या डोक्यावर गोमुत्र टाका. सत्तारांना हे कळत नाही की गोमुत्र किती पवित्र असतं. आम्ही रोज घरात हिंदुत्वाप्रमाणे गोमुत्र शिंपडतो, आम्ही हिंदुत्व जाणतो. मात्र, हे वाटेल तसं बोलतात. सत्तार म्हणाले की, मी आता पालकमंत्री म्हणून किती चांगलं काम करत आहे. याआधी कोणीचं कामं केली नाहीत. मात्र, सत्तारांनी कामं करून दाखवावी. त्यांना या कामातलं काय समजतं. डीपीडीसीमध्ये काय चाललं आहे हे काही समजतं का? ते फक्त पैसे कसे मिळतील हे पाहतात.”
“शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) यांना काय दिलं नाही. असं असताना हे उद्धव ठाकरेंना सोडून गेले, शिवसेना (Shivsena) सोडून गेले. तिकडे एकनाथ शिंदेंच्या मागेपुढे फिरून कॅबिनेट मंत्रिपद घेतलं, मात्र इकडे कॅबिनेट मंत्रिपद मिळालं नाही का? कशासाठी हे सर्व सुरू आहे? इथेही ते कॅबिनेट मंत्री होते”, असंही चंद्रकांत खैरेंनी म्हटलं आहे.
ते पुढे म्हणाले, “अब्दुल सत्तारांनी तेच केलं. मात्र, सत्तार नावाचा हा हिरवा साप संभाजीनगर कधीच म्हणत नाही. ते औरंगाबाद म्हणतात. एकदा डीपीडीसीमध्ये मी माईकनं मारणार होतो. पण तेव्हा पतंगराव कदम (Patangrao Kadam) माझ्या बाजूला होते. ते म्हणाले खैरे तुम्ही पालकमंत्री होता असं मारामाऱ्या करू नका. मी पतंगरावांना सांगितलं की, सत्तार संभाजी महाराजांचा अपमान करतात. त्यांना काय सोडायचं? यांनी अनेक जमिनी हडपल्या आणि हे यांचे मंत्री आहेत”, असं म्हणत खैरेंनी सत्तारांवर टीकास्त्र सोडलं.