चंद्रकांत पाटलांनी भीतीपोटी चेहराच घेतला झाकून

पिंपरी चिंचवड : (Chandrakant Patil Pimpri Chinchwad Thadi Jatra) काहीच दिवसांपूर्वी भाजप नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil BJP) यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. त्यानंतर संपूर्ण राज्यभर याचे पडसाद उमटले होते. चंद्रकांत पाटील यांनी “डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी भिक मागून शाळा सुरु केल्या.” असं वक्तव्य केलं होतं. त्याविरोधात समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांकडून चंद्रकांत पाटील यांच्या चेहऱ्यावर शाई फेकण्यात आली होती. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांना डोळ्याला इजा होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे आज पिंपरी चिंचवडमध्ये त्यांनी एका कार्यक्रमात थेट फेस शिल्ड घालूनच उपस्थिती लावली. (Pune News Chandrakant Patil

आज, पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेकीची धमकी फेसबुकच्या माध्यमातून करण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी आज पिंपरीत थडी जत्रेच्या उद्घाटन कार्यक्रमात फेस शिल्ड लावली आहे. आपल्या चेहऱ्याचं रक्षण करण्यासाठी त्यांनी असं केल्याची माहिती आहे.

राष्ट्रवादीच्या विकास लेले यांनी एक फेसबुक पोस्ट केलेली आहे. त्यामध्ये त्यांनी आज पुन्हा शाईची मुक्त उधळण अशा आशयाची पोस्ट केली आहे. त्यावर त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

Dnyaneshwar: