मुंबई : (Chandrakant Patil On Balasaheb Thackeray) अयोध्येतील बाबरी मशीद पाडली, त्यात शिवसैनिक आणि बाळासाहेब ठाकरे सहभाग नसल्याचं वक्तव्य भाजपचे जेष्ठ नेते आणि उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. यांच्या या व्यक्तव्यानंतर राज्यभर टीकेचे धनी झाले. तर भाजपमध्ये देखील उघड नाराजी दिसून येत आहे. चंद्रकांत पाटील यांनी असं बोलायला नको होतं. बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी केलेलं वक्तव्य हे वैयक्तिक मत असल्याच मत मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केलं आहे.
आशिष शेलार बोलताना म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांचं मत हे वैयक्तिक आहे. बाबरी मशीद पाडण्याच्या बाबतीत भाजप कधीच काही बोलले नाही. बाबरी मशीद पाडण्याची समस्त हिंदू धर्माची मागणी होती. चंद्रकांत पाटील यांनी तसं बोलायला नको होतं. तर त्यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांनाही लक्ष केलं आहे. बाबरी मशीद पाडण्यात तुमच काय योगदान आहे असा सवलही शेलार यांनी केला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या व्यक्तव्यानंतर भाजपला आगामी निवडणूकांमध्ये फटका बसण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे आता भाजपने सावध पवित्रा घेतल्याचं दिसून येत आहे. पाटील यांनी त्यांचे वैयक्तिक मत मांडले असून, ती पक्षाची भूमिका नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
अयोध्येत राममंदिर उभारण्याच्या प्रक्रियेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकांचा मोठा सहभाग होता, असेही बावनकुळे यांनी माध्यमांपुढे जाहीर केले. भाजपने आपली भूमिका उघडपणे सांगितल्याने पाटील हे एकाकी पडल्याचे बोलले जात आहे.