“पुण्याला कुणीच वाली राहिला नाही”; नीलम गोऱ्हेंच्या टीकेवर चंद्रकांत पाटील म्हणाले…

पुणे | Chandrakant Patil On Neelam Gorhe – विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी विधीमंडळ अधिवेशनात पुण्याचे प्रश्न मांडले न गेल्यावरून भाजप आमदारांवर टीका केली आहे. पुण्याचे प्रश्न मांडले न गेल्याने अनेक प्रश्न प्रलंबित राहिल्याचा आरोप करत पुण्याला कुणीच वाली राहिला नसल्याचा टोला निलम गोऱ्हे यांनी पुण्यातील भाजप आमदारांना लगावला आहे. याच संदर्भात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, “एकतर नीलम गोऱ्हे सभापती म्हणून स्वत:चे अधिक अधिकार वापरतात. ते त्यांनी पुण्यासाठी वापरायला अडचण नव्हती. खरंतर सभापतींनी सर्वांचं ऐकायचं असतं. परंतू, सदस्यांपेक्षा त्याच जास्त बोलतात. सभापतींनी पक्षाचा प्रवक्ता बनायचं नसतं, तर या पक्षाचा प्रवक्ता बनतात. त्यांना पुण्याचे प्रश्न सोडवण्यापासून कुणी अडवलं नव्हतं.”

“अडीच वर्षांचं सरकार होतं, थोडंथोडकं नाही. त्या काळात त्यांनी पुण्यासाठी काय काय केलं याची यादी द्यावी”, अशी मागणी देखील चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

Sumitra nalawade: