मुंबई : (Chandrakant Patil On Uddhav Thackeray) काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात राजकरणा तापलं आहे. राहुल गांधी यांच्या विरोधात भाजप आणि शिंदे गट आक्रमक झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी मात्र राहुल गांधी यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाहीत असं म्हटलं यानंतर उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, “आजानची स्पर्धा घेण याकडे गाडी चालली होती ती ट्रॅकवर आली. लव्ह जिहाद, धर्मांतरण या विषयावर त्यांच्याही मनात आग पेटली ही चांगली गोष्ट आहे. ही कॉंग्रेसच्या पेटू शकत नाही. कारण ही त्यांची वोटबॅंक आहे. ही वोटबॅंक उद्धव ठाकरें यांची कधीच नव्हती.
सरकार आणि वोटबॅंकपायी त्यांना मोह झाला आणि तेही त्यांच्या सुरात सूर मिसळायला लागले. जर सावरकरांच्या निमत्ताने ही चूक झाली हे लक्षात आलं असेल तर ती सुधारणे सर्वसामान्यांना आवडेल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.