“सुप्रिया सुळेंची माफी मागितल्याशिवाय पुण्यात फिरू देणार नाही”; रूपाली पाटील-ठोंबरेंचा पाटलांना इशारा!

पुणे – Rupali Patil Thombare on Chandrakant Patil | भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील (MLA Chandrakant Patil) यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांच्यावर टीका केली होती. या टीकेनंतर आता राष्ट्रवादीचच्या नेत्यांनी पाटलांना धारेवर धरलं आहे. अशातच राष्ट्रवादीच्या पुण्यातील (Pune) नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी चंद्रकांत पाटील (Rupali Patil Thombare on Chandrakant Patil) यांना थेट धमकीवजा इशारा दिला आहे.

स्वयंपाक घरात असणारी महिला अन्नपूर्णा देवी असते. मसनात असणारी महाकाली असते, ती महाकाली तुमच्यासारख्या राक्षसाच्या वृत्तीचे मुंडके छाटल्याशिवाय शांत होत नसते. सुप्रिया सुळेंची माफी मागा अन्यथा पुण्यात फिरू देणार नाही, तुम्ही आम्हाला मारलं तर आम्ही गाल पुढे करणारे नाहीत तर हात तोडू, अशा शब्दात रूपाली ठोंबरे यांनी पाटलांवर निशाणा साधला आहे. त्यासोबतच राष्ट्रवादीच्या युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांनीही पाटलांवर टीका केली आहे.

दरम्यान, सुप्रिया सुळेंसह महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींची माफी मागावी,अन्यथा महाराष्ट्रात त्यांना कुठेही फिरू देणार नाही, असं सक्षणा सलगर (Sakshana Salgar) यांनी म्हटलं आहे.

RashtraSanchar: