मुंबई : महाजनको ची विजेची क्षमता कमी करून बाहेरून वीज मागवण्यात महाविकास आघाडी सरकारचे नक्कीच काहीतरी षड्यंत्र आहे म्हणून भारतीय जनता पक्ष आज संध्याकाळी साडेसहा वाजता ज्या ठिकाणी अंधार असेल अशा सर्वच ठिकाणी कंदील आंदोलन करणार आहे, अशी घोषणा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
बावनकुळे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, सरकारच्या चुकीच्या धोरणाचा आम्ही कंदील आम्ही दाखवणार आहोत. तसेच महा विकास आघाडी सरकारच्या नेत्यांच्या घरी कंदीलही सप्रेम भेट म्हणून पाठवणार आहोत.
सरकार या सौम्य आंदोलनानं थांबलं नाही तर राज्यभरातून खेड्यापाड्यातून शेतकरी मोठे मोर्चे काढतील. भारतीय जनता पक्ष या मोर्चामध्ये सहभाग घेईल जनआक्रोश होण्याचीही शक्यता आहे, असा इशाराही बावनकुळे यांनी यावेळेस बोलताना दिला.
राज्य मध्ये दीड हजाराच्या वर अनियमित भारनियमन सुरू आहे सरकार दावा करत आहे कि भारनियमन नाही अगदी गडचिरोली पासून ते कोल्हापूर पर्यंत शेतकऱ्यांना केवळ दोन तास वीज मिळत आहे मी आधी ही सांगितलं होतं की ऊर्जामंत्री केंद्र सरकारच्या नावानं खडे फोडत आहे.
तसेच केंद्र सरकारने काल 5000 च्यावर मेगावॅट वीज राज्याला दिली. एनटीपीसीने एकूण त्यांच्या विजेच्या 750 पट जास्त वीज दिली आहे. इतकच नव्हे तर मागच्या सरकार पेक्षा जास्त कोळसाही दिला आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी च्या दरम्यान जे नियोजन करायचं होतं ते सरकार आता करत आहे नियोजन बिघडल्यामुळे आता जे सरकारचं पाप आहे. ते केंद्र सरकारवर फोडण्याचा प्रकार राज्याकडून करण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळेस लगावला आहे.