मुंबई : (Chandrashekhar Bavankule On Sharad Pawar) राष्ट्रवादी काॅंग्रेसचे सर्वासर्वे शरद पवार यांनी सोमवार दि. 29 रोजी मुख्यमंत्री एकानाथ शिंदेंच्या बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकांसाठी दौरा केला. यावेळी त्यांनी भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी निवडणुक काळात जनतेला दिलेल्या आश्वासनामुळे जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावर संभ्रम असल्याचे विधान केलं होतं.
दरम्यान, भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, ही राजकीय भेट नसून, कौटुंबीक स्वरूपाची आहे. त्यांची ही भेट तोंडावर मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर झाल्यामुळे त्याचे राजकीय अर्थ काढले जात आहे. भाजप-मनसे युतीवर विचारले असता, ते म्हणाले “युतीबाबत आमचे दिल्लीतील आणि राज्यातील वरिष्ठ नेते निर्णय घेतील, माझ्याकडे फक्त पक्षवाढीचं काम आहे”, असे सुचक विधान केलं आहे.
दरम्यान, शरद पवारांच्या ठाणे दौऱ्याविषयी विचारले असता बावनकुळे म्हणाले, यापुर्वी शरद पवारांनी खूप वेळा महाराष्ट्र पिंजून काढला आहे. मात्र त्यांना कधीही 60 च्या वर विधानसभेच्या जागा जिंकता आल्या नाहीत. पवार साहेबांचे आत्तापर्यंतचे राजकारण पाहिले तर ते जेव्हा-केव्हा सत्तेत आले, तेव्हा कुणालातरी तोडून आणि संपावून आले आहेत, असं बावनकुळे म्हणाले आहेत.