नागपूर | Ajit Pawar – विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. यादरम्यान सत्ताधारी व विरोधी पक्षांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार ( ajit pawar )यांनी विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करण्याचे वक्तव्य केले, याला पलटवार म्हणून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ( chandrashekhar bawankule ) यांनी अजित पवारांना चांगलेच उत्तर दिले आहे. करेक्ट कार्यक्रम कुणाचा करायचा हे जनता ठरवेल, आमचा करेक्ट कार्यक्रम करण्याची हिम्मत अजून कुणात नाही, असे बावनकुळे म्हणाले.
पुढे ते म्हणतात, अजित पवारांच्या तोंडी हे शब्द शोभत नाहीत. आम्हाला माहिती आहे वेळप्रसंगी अजित पवार मोबाईल बंद करून पळून जातात, कधी रडतात तर कधी अंडरग्राउंड होतात, हे अजित पवार आम्ही बघितले आहेत. त्यामुळे विदर्भात येऊन आम्हाला आवाहन देऊ नये.
कुणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा हे खरंतर जनताच ठरवते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीत युती राहूनही कधी राष्ट्रवादी 75 च्या वर आकडा गेला नाही, ते काय आमचा करेक्ट कार्यक्रम करणार ? बारामती शहराचा विकास म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघाचा किंवा पश्चिम महाराष्ट्राचा विकास नाही. मी दाव्याने सांगतो की, बारामती शहर सोडता संपूर्ण लोकसभा मतदारसंघात अजित पवारांच्या वागण्याबद्दल लोकांमध्ये नाराजी आहे. बारामतीमध्ये हुकुमशाही, मोगलशाहीसारखा कारभार सुरू आहे. तिथे माझी एंट्री झाल्यापासून अजित पवारांना भीती वाटत आहे. म्हणून त्यांनी करेक्ट कार्यक्रम करू, असे म्हटले. आमचा करेक्ट कार्यक्रम करण्याची त्यांच्यात हिंमत नाही.