सत्यजीत तांबेंना भाजपचा पाठिंबा? बावनकुळेंनी स्पष्ट केली भुमिका, म्हणाले…

मुंबई : (Chandrashekhar Bawankule On Satyajeet Tambe) प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघासाठी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. पण त्यांच्या या खेळीमुळं भाजप त्यांना पाठिंबा देणार असल्याची सध्या चर्चा रंगली आहे. या चर्चेला आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली.

बावनकुळे म्हणाले, जर सत्यजीत तांबे यांनी निवडणुकीसाठी भाजपला पाठिंबा मागितला तर आम्ही त्यांना पाठिंबा देण्याचा विचार करु. आम्ही अद्याप या निवडणुकीसाठी अजून कुठलंही नाव पक्ष नेतृत्त्वाला पाठवलेलं नाही. राजेंद्र विखेंच नाव आम्ही पाठवणार होतो. त्यांनीच निवडणूक लढावी यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केले. राधाकृष्ण विखे पाटलांनी यासाठी पुढाकार घेतला होता.

मात्र, राजेंद्र विखे यांनी म्हटलं की, गेल्या पाच-सहा महिन्यांपूर्वी जर उमेदवारी जाहीर झाली असती तर मला निवडणूक लढवता आली असती. त्यामुळं शेवटच्या वेळेवर त्यांनी असमर्थता दर्शवली. त्यामुळं मला वाटतं ही अपक्षांची निवडणूक आहे. भाजपनं कोणालाच एबी फॉर्म दिलेला नाही, असंही बावनकुळे यांनी यावेळी सांगितलं.

Prakash Harale: