“शरद पवार हे भोंदुबाबा, जादुटोणा करून उद्धव ठाकरेंना जाळ्यात ओढलं;” बावनकुळे

सातारा : (Chandrashekhar Bawankule On Sharad Pawar) भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करत शरद पवार यांनाही टोला लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने उद्धव ठाकरे यांच्यावर जादुटोणा केला आहे. यामुळे उद्धव ठाकरे त्यांच्या प्रमाणे विचार करायला लागले आहेत. या पक्षातील भोंदुबाबाच्या ताब्यात कोण आलं तर तो सुटत नाही, असं म्हणत शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटील यांनी सत्तेचं स्वप्न सोडून दिलं पाहिजे. आजही त्यांना सत्ता गेल्यासारखं वाटत नाही. जयंतरावांनी काळजी करू नये. आम्ही पुन्हा सत्तेत येवू देणार नाही. आमचे २०० आमदार पुढच्या निवडणुकीत निवडून येतील, असा दावा यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसने बेईमानीने सत्ता स्थापन करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. राष्ट्रवादीने उद्धव ठाकरेंवर जादुटोणा केला आणि त्यामुळे उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत गेले. म्हणून उद्धव ठाकरेंचं मन वळलं आणि ते पवार साहेबांकडे गेले. पण आता आम्ही इतके अलर्ट आहोत की आम्ही शिंदे आणि फडणवीस पुढच्या काळात २०० हून अधिक आमदार आमचे निवडून येतील, असं बावनकुळे म्हणाले.

Prakash Harale: