ब्रिजभूषण सिंह यांच्या अडचणीत वाढ, ‘या’ आरोपांखाली त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल

नवी दिल्ली | Brij Bhushan Singh – ब्रिजभूषण सिंह (Brij Bhushan Singh) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दिल्ली पोलिसांना आता त्यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. कुस्तीपटूंनी केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या तक्रारीवरून ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलं आहे. त्यामुळे ब्रिजभूषण यांच्यावर लवकरच कारवाई केली जाईल, असं दिल्ली पोलिसांनी सांगितलं आहे. यासंदर्भातलं वृत्त इंडियन एक्स्प्रेसनं दिलं आहे.

ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. तसंच त्यांच्याविरोधात कलम 354 अ लैंगिक छळ, कलम 354 डी पाठलाग करणे, कलम 354 विनयभंग, कलम 506 धमकी देणे हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे ब्रिजभूषण यांच्यावर कलम 354, 354 अ आणि 354 डी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर कलम 354 आणि 354 अ अंतर्गत त्यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावली जाऊ शकते.

दरम्यान, ब्रिजभूषण यांच्याविरोधात चार्जशीट दाखल झाल्यानं त्यांना आता सुनावणीसाठी बोलावलं जाऊ शकतं. त्याचबरोबर या चार्जशीटमध्ये अन्य ज्या साक्षीदारांची नावं आहेत त्यांना देखील बोलावलं जाणार असल्याचं आरोपपत्रात म्हटलं आहे.

Sumitra nalawade: