…म्हणून मी बाळासाहेबांविरोधात अब्रू नुकसानीचा खटला केला, भुजबळांनी सांगितला ‘तो’ किस्सा!

मुंबई : (Chhagan Bhujbal On Balasaheb Thackeray) गुरुवारी (१३ ऑक्टोबर) मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात छगन भुजबळ यांचा ‘अमृत महोत्सव’ सोहळा पार पडला. यावेळी भुजबळ बोलत होते. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याविरोधात दाखल केलेल्या अब्रूनुकसानीचा किस्सा सांगितला आहे. छगन भुजबळ पुढे म्हणाले, “मी बाळासाहेब ठाकरेंवर अब्रू नुकसानीचा खटला दाखल केला. कारण एकीकडे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची क्लीन चिट, तर दुसरीकडे सामनाचं ‘हाच तो नराधम’ या मथळ्याखाली वृत्त.

काही महिन्यांनी सुभाष देसाई, संजय राऊत आले आणि एक चिट्ठी दिली. काही महिन्यांनी सुभाष देसाई, संजय राऊत आले आणि एक चिट्ठी दिली.” ते म्हटले बाळासाहेबांचं वय झालं, आजारीही असतात. माझ्या लक्षात आलं. मी म्हटलं थांबा, आता काहीच बोलू नका. काय करायचं हे मला कळलं. केस कधी आहे ते सांगा. त्यांनी तारीख सांगितली. मी त्या दिवशी न्यायालयात गेलो. मी न्यायाधीशांना विनंती केली की मला केस मागे घ्यायची आहे. पाच मिनिटे ते ऐकायलाच तयार नव्हते. ते म्हणाले केस पूर्ण झाली. केसचा काय निकाल आहे हे तुम्हाला कळतं का? तुम्ही काय करता असं मला म्हटले,” असं छगन भुजबळांनी सांगितलं.

आठ दिवसांनी बाळासाहेबांनी मला फोन केला आणि पूर्ण कुटुंबाला घेऊन मातोश्रीवर यायला सांगितलं,” असं भुजबळांनी नमूद केलं. “यानंतर मी, समीर, पंकज, त्यांच्या मुली असे सगळे मातोश्रीवर गेलो. तीन-चार तास चर्चा, चहा, नाश्ता, जेवण झालं. जणुकाय आमच्या आयुष्यात काही घडलंच नाही. ते भांडण झालंच नाही,” असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.

Prakash Harale: